कर्तृत्वाची यशोगाथा
- डॉ.अजय मधुकर कोष्टी
मेकॅनिकल इंजिनिअर होण्याची क्षमता अजय कोष्टी यांच्यात उपजतच होती. शाळेतील प्रदर्शनासाठी हस्तकला चित्रकला विज्ञान विषयक प्रकल्प किंवा यांत्रिक प्रतिकृती बनवण्याची वेळ आली की शाळेच्या चमूचे नेतृत्व अजय हिरीनी करत. कागद, कार्डबोर्ड, लाकूड, काड्या, इ. सामग्री कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय अथवा नमुन्याशिवाय अजय हस्तकलेद्वारे असंख्य वस्तू तयार केल्या. स्टिअरिंग तंत्र असलेली कार, लँडिंग गियर असलेले विमान, हवेत भरारी घेणारा ग्लायडर, पतंग, दिवाळीत वापरले जाणारे विविध आकारांचे आकाशदिवे, मानवी तसेच इतर आकाराची स्पंजची शिल्पे. परंतु त्या काळातील जुन्या पद्धतीच्या शाळांमध्ये अशा प्रकारच्या कौशल्यांना वार्षिक गुणपत्रिकेत कुठेच स्थान नसे त्यामुळे अजयला शाळेतील सगळी वर्षी उपविजेत्या साठी आरक्षित श्रेणीत घालवावी लागली
पार्ले टिळक मधून शालांत शिक्षण संपवून अजयने पार्ले महाविद्यालयातील विज्ञान शाखेत गणित, रसायनशास्त्र आणि पदार्थविज्ञान हे विषय घेऊन प्रवेश घेतला. अजयला गणित आणि पदार्थविज्ञान या विषयात गोडी वाटू लागली त्याच्या अभ्यासाच्या उर्मी महाविद्यालय अभ्यासक्रमाच्या मर्यादांच्या पुढे ओसंडू लागल्या पदार्थ विज्ञानावर त्यांचं प्रेम गाढ होत गेलं त्याला कारणे दोन. एक म्हणजे त्याच्या वडिलांचे मित्र चौधरी यांचा प्रभाव आणि दुसरे म्हणजे त्याच्या वाचण्यात आलेलं रेस्निक आणि हॉलिडे ह्या लेखकद्वयांचे पदार्थ विज्ञानाचे पुस्तक. पार्ले विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षी ते पहिल्या तीन विद्यार्थ्यात झळकले.
इंटर सायन्सनंतर अजय यांनी आयआयटीला प्रवेश घेण्याचे निश्चित केले. आय.आय.टी.मधील शिक्षणाने अजय यांच्या पृथ:करणीय कौशल्याला धार चढली. अमेरिकेसारख्या देशातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकी करण्यासाठीची जणू गुरुकिल्लीच मानली जाते. अजयसाठी आय.आय.टी.मध्ये घालवलेली वर्षे जीवनातील सर्वोत्तम काळापैकी एक ठरली. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि भक्कम परिचय पत्र पाहून अजय यांना भारतातील अनेक कंपन्यांकडून नोकरीसाठी प्रस्ताव आले होते. अजय यांना अधिक तांत्रिक आणि नाविन्यपूर्ण काम करायचे होते. येथील कामगार, मुकादम इतर कर्मचाऱ्यांच्या असहकार्याच्या वृत्तीमुळे अजय यांना भारत सोडून ओक्लाहोमा विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात एम एस्सी करिता प्रवेश घेण्याचा निर्णय घेणे भाग पडले.
तेथील मित्र नितीन धोंड आणि त्यांची पत्नी अंजली या दाम्पत्याच्या सहकार्यामुळे त्यांच्या अमेरिकेतील सुरुवातीचे दिवस कष्ट विरहित गेले. नितीन आणि डॉ.अजय या दोघांचेही संशोधन प्रबंध सल्लागार होते डॉ.डेव्हिस ईगल ध्वनि उत्सर्जन तंत्रज्ञानातील तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. अल्ट्रासोनिक मॅनेजमेंट ऑफ स्ट्रेस हा विषय त्यांनी संशोधनासाठी निवडला होता. नियमितपणे त्यांना मार्गदर्शन देत असत. शिवाय साप्ताहिक आढावा बैठकासुद्धा घ्यायचे. इतकं सोडल्यास अजयला त्यांच्या पद्धतीने कार्य करण्यास पूर्ण स्वातंत्र्य होते.
मजबूत पदवी आणि डॉ. डेव्हिस यांचे शिफारस पत्र अशी प्रभावी आयुधे भात्यात घेऊन अजय लॉस एंजेलिसला नोकरीच्या शोधात पोहोचले. 1985 मध्ये नोकरी बाजार मंदीत होता. थोड्या वणवणी नंतर एक नोकरी धरली ती उत्पादकता पर्यवेक्षक नियोजक म्हणून. हे काम तसं जिकिरीचं होतं. आजच्या काळात तसलं काम संगणकाच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही. दोन वर्षात अजयला ग्रीनकार्ड प्राप्त झाले. अधिक तांत्रिक पद्धतीचे कार्य करण्याची इच्छा असल्यामुळे अजयने ती नोकरी सोडली आणि एका दीर्घ सुट्टीवर भारतात पोहोचले.
अजयचे परिचय पत्र, प्रकाशित पेपर्स, संशोधन काळातील अनुभव आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग संदर्भातील त्यांची प्रमाणपत्रे इत्यादीच्या आधारावर रॉकवेलचे पर्यवेक्षक बॉब बॅरेट यांनी त्यांना सेवेत रुजू होण्यास सांगितले.
रॉकवेलला असताना यांना नासाच्या अंतरिक्षयान कार्यक्रमात विमानाच्या हार्डवेअरचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अंतरिक्ष यान एंडेव्हवरच्या जुळवणीचे काम रॉकवेल करत होते. अंतरिक्ष यानाच्या उपग्रह कार्यक्रमाकरिता अजयचे अल्ट्रासोनिक मेजरमेंट ऑफ स्ट्रेस या विषयावरील ज्ञान येथे उपयोगी ठरले. अंतरिक्ष यान उपग्रह कार्यक्रमाकरिता अल्ट्रासोनिक मेजरमेंट ऍप्लिकेशन्स विकसित करण्याच्या कामाचे नेतृत्व अजय यांच्याकडे आले. अंतरिक्ष यान जुळलेल्या महत्त्वाच्या सांध्यांवर आवश्यक भारत क्षमता तपासण्याकरिता या पद्धतीचा उपयोग केला जातो. सगळ्या अंतरिक्ष यांच्या पंखांची रुंदी मोजण्याच्या कामाच्या निमित्ताने अजय यांचे नासाला जाणे झाले होते. तेथे त्यांची भेट मरिअन जे. पार्कर यांच्याशी घडून आली. त्यांनी असा सल्ला दिला अजय यांनी त्यांच्या शाखेला बदली करून घेतल्यास ते योग्य होईल. त्याच बरोबरीने पार्कर यांनी सल्ला दिला की अजय यांनी आता परीक्षणाच्या नवीन तंत्रज्ञानाकडे बघायला हवं आणि त्यासाठी नवीन परीक्षण प्रयोगशाळासुद्धा उभारली पाहिजे. प्रिलोड मेजरमेंट एप्लिकेशन विकसित करण्याच्या कामातील अजयचा धडाका पाहून पार्कर अतिशय प्रभावित झाले होते. नासाकडून तगडी अनुदान राशि प्राप्त झाली आणि अजयने इन्फ्रारेड थरमोग्रफीवरील संशोधन कार्यास जोमाने सुरुवात केली आणि काही संगणकीय सॉफ्टवेअरचे लिखाण केले.
अजयने स्वबळावर लिहून काढलेले अल्ट्रासोनिक रिलोड मेजरमेंट या विषयावरील काही पेपर्स प्रकाशित केले. बीएससीकरिता अजयने सादर केलेला प्रबंध आणि त्यांच्या प्रकाशित झालेल्या पेपरच्या आधारावर त्यांना डी एस सी ची पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी सादर केलेला प्रबंध नंतर एसबीआय परिषदेत सादर केला आणि तो त्यांच्या कार्य वृत्तात देखील प्रकाशित झाला. त्यातील एक पेपर बोईंगकंपनीद्वारे एका पेटंटमध्ये सुद्धा वापरला गेला.
नॉर्मन रिंग यांनी अजयला 'जी एस' प्रणाली शिकण्यास मदत केली त्यांनी अजय यांना विमानांच्या बोल्टयुक्त जोडांच्या विश्लेषणाच्या कार्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. जी.एस. ई. आणि ओ.एच.ई.संबंधित अनेक मुद्द्यांवर अजय ह्यांनी समाधानकारक उत्तर शोधले होते. अंतरिक्ष यांनासाठीचे जॅक, अंतरिक्ष यांनाचे वजन करणे, अंतरिक्ष यांनाचे उच्चलन आणि त्याचे बाह्य टाक्यांची जोडणी आणि तोडणी, अंतरिक्ष यांनास ओढून नेण्याचे तंत्र (टोइंग) आणि अंतरिक्ष यानाची बोईंग ७४७ ह्या विमानावरून ने-आण करणे अशा विविध बाबतीत पुढे आलेल्या समस्या अजय यांनीं सोडवल्या.
नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरला रुजू होऊन डॉ. अजय यांना तीन महिने होण्याच्या आत म्हणजेच जानेवारी 2004 मध्ये जो यांनी घोषणा केली की त्यांची अंतराळ अंतराळवीर होण्यासाठी म्हणून निवड झाली आहे आणि त्यांनी अजय यांना यानाच्या पंखाच्या पुढील टोकाच्या एन.डी.ई. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी सोपवली. जो इतकेच करून थांबले नाहीत तर त्यांनी डॉ. अजय यांच्या पदाचे नव्याने लीड इंजिनीयर असे नामकरण केले आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रात जे.एस.सी. द्वारा चालवले जात असलेले सगळे एन.डी.ई.संबंधित कार्यक्रम आणले. डॉ. अजय यांच्या चमूत साधारण 150 लोक कार्यरत होते. ज्यात नासाच्या सर्वच प्रमुख केंद्रातील कर्मचाऱ्यांचा तसेच सुमारे डझनभर कंत्राटदारांच्या माणसांचा समावेश होता. हे काम ह्या टीमने वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि उड्डाणाचा कार्यक्रम पुन्हा रूळावर येण्याच्या दृष्टीने त्यांची अंमलबजावणीसुद्धा केली.
डॉ. अजय लीड एन.डी.ई. इंजिनिअरच्या अधिकारात तो कार्यक्रम पूर्णत्वाला जाईपर्यंत अंतरिक्ष यानावर काम करत राहिले. त्याकरता आंतर- केंद्र अंतरिक्षयान गटाच्या साप्ताहिक बैठका ते न चुकता घेत राहिले. दरम्यान इन्फ्रारेड थरमोग्रफी रायटिंग सॉफ्टवेअर संबंधित संशोधन डॉ. अजय यांनी सुरू ठेवले होते त्यातूनच त्यांनी नासाकरिता दोन पेटंट मिळवले आणि सॉफ्टवेअर परवानासुद्धा प्राप्त केला. अंतरिक्ष शटल कार्यक्रम 2010 च्या सुमारास डळमळीत होऊ लागला तेव्हा डॉक्टर यांनी ओरायन कार्यक्रमावर लीड एन.डी.ई. इंजिनीअर म्हणून काम सुरू केले. ओरायनकरिता डॉ. अजय आजही युरोपियन स्पेस एजन्सी सोबत युरोपियन सर्विस एसएम करीता कार्यरत आहेत.
नासाचे अमेरिकन कंत्राटदार जसे बोईग, लॉकहिड, स्पेस-एक्स, जॅकब्स इंजिनिअरिंग,एन.टी.के यांच्या जोडीलाच नासाचे भागीदार जसे युरोपियन स्पेस एजन्सी/एअर बस ही मंडळी नासातर्फे नॉन डिस्ट्रक्टिव्ह संदर्भात डॉक्टर अजय यांचा वेळोवेळी सल्ला घेत असतात.
डॉ. अजय यांना स्पेस अवॉर्ड प्राप्त आहे फ्लॅश थर्मोलॉजीमधील सर्वसामान्य अवस्थेला आणलेली विसंगती मोजणी आणि अनुमानित करणे याच्या पद्धतींवर केलेल्या संशोधनाकरिता त्यांना पेटंट अॅवार्डनेसुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. डॉ.अजय कोष्टींना सॉफ्टवेअर इनिशियल अॅवार्ड प्राप्त झाले आहे यासाठी की त्यांनी इन्फ्रारेड थर्मालॉजी ईव्हॅल्युएशन सॉफ्टवेअर असे नामाभिधान केलेले वैज्ञानिक किंवा तांत्रिक प्रकारचे सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या कामात भरीव योगदान दिले होते. नासाने त्याला मान्यता दिली होती आणि त्याचे नामकरण सॉफ्टवेअर फॉर इन्फ्रारेड थर्मोग्राफी एम.एस.सी. २५९५०-१ असे केले होते.
नॉन-डिस्ट्रक्टिव्ह इव्हॅल्युएशन प्रकारात इतक्या सगळ्या पद्धती वापरणे ज्यात एक्स-रे, रेडिओग्राफी, एक्स-रे कॉम्प्युटेड टाॅमोग्रफी, अल्ट्रासोनिक टेस्टिंग, पार्टिकल टेस्टिंग, डाय पेनिट्रेशन टेस्टिं, लेजर शिअरोग्राफी आणि इन्फ्रारेड थरमोग्रफी सामील आहे. हे थोडं आश्चर्यकारक अशाकरिता की एक इंजिनियर सर्वसाधारणपणे यापैकी एक किंवा फार तर दोन पद्धतींचा वापर करत असतो. इतके सगळे महत्त्वाचे उपक्रम एक व्यक्ती एकाच वेळी सांभाळते हे अद्भुतच.