औद्योगिक उत्पादन निर्देशांक

PicResortमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन धोरण राबविणारी राज्यातील प्रमुख संस्था आहे. सन २०१३-१४ मध्ये केंद्र पुरस्कृत (१०० टक्के) पाच प्रकल्पांकरिता रु. ६७.७० कोटी मंजूर केले असून रु. ५.५९ कोटी वितरित केले आहेत व रु. ४.५७ कोटी इतका खर्च झाला आहे. सन २०१३-१४ मध्ये राज्य शासनाने सहा प्रकल्पांसाठी रु. २८२.४५ कोटी मंजूर केले असून रु. ७२.९० कोटी वितरीत केले आहेत व रु. ४०.९३ कोटी इतका खर्च झाला आहे.

खनिजे :
राज्यातील खनिज साठा क्षेत्र विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व यवतमाळ, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे या जिल्ह्यांमध्ये विखुरलेले असून तेथे कोळसा, चुनखडी, मॅंगनीज, बॉक्साईड, कच्चे लोखंड, डोलोमाईट, लेटराईट, कायनाईट, फ्लोराईट (ग्रेडेड), क्रोमाईट, सिलीका वाळू, क्वार्टझ, इत्यादी खनिजांचे साठे आढळून येतात. राज्यात उत्पादनक्षम खनिज साठा असणारे सुमारे ५८ हजार चौ. किमी इतके क्षेत्र असून ते राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १९ टक्के आहे. मार्च, २०१४ अखेर राज्यात ०.६ लाख रोजगार असलेल्या प्रमुख खनिजांच्या २९० खाणी कार्यरत आहेत. राज्यातील २०१३-१४ मध्ये उत्खनन केलेल्या खनिजांचे एकूण मूल्य रु. ७,०४७ कोटी होते. यापैकी उत्खनन केलेल्या कोळशाचे मूल्य रु. ५,५७८ कोटी (७९ टक्के) होते.

औद्योगिक उत्पादन निर्देशांक :survay 1
औद्योगिक क्षेत्राची वाढ औद्योगिक उत्पादन निर्देशांकाद्वारे मोजली जाते. सध्याच्या औद्योगिक उत्पादने निर्देशांकामध्ये खाणकाम, वस्तुनिर्माण व विद्युत या क्षेत्रांचा समावेश आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय अखिल भारतीय स्तरावर मासिक औद्योगिक उत्पादन निर्देशांक संकलित करून जाहीर करते. अखिल भारतीय स्तरावरील औद्योगिक उत्पादन निर्देशांक (पायाभूत वर्ष २००४-०५) एप्रिल- डिसेंबर, २०१३ मधील १६८.३ वरून एप्रिल- डिसेंबर, २०१४ मध्ये १७१.८ इतका अल्प प्रमाणात वाढला. या निर्देशांकातील वाढ एप्रिल- डिसेंबर, २०१४ या कालावधीत २.१ टक्के होती. जी गतवर्षाच्या तत्सम कालावधीत ०.१ टक्के होती. अखिल भारतीय औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा तपशील बाजुच्या तक्त्यांमध्ये दर्शवलेला आहे.

survay 2

वार्षिक उद्योग पाहणी :
वार्षिक उद्योग पाहणीत कारखाना अधिनियम, १९४८ खाली नोंदी झालेल्या सर्व कारखान्यांचा आणि विडी व सिगारेट कामगार (रोजगाराच्या अटी) अधिनियम, १९६६ खाली नोंद झालेल्या विडी व सिगारेट आस्थापनांचा समावेश आहे. वार्षिक उद्योग पाहणी २०१२-१३ च्या अस्थायी आकडेवारीवरून निदर्शनास येते की स्थूल मूल्यवृद्धी, स्थिर भांडवल व कामगार वेतन यामध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा वाटा अनुक्रमे १९.६ टक्के, १५.९ व १९.८ टक्के असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. एकूण उद्योगांच्या बाबतीत राज्य देशामध्ये दुसर्‍या क्रमांकावर असून याबाबतीत राज्याचा वाटा १३ टक्के आहे.
देशातील एकूण उत्पादन मूल्य, खेळते भांडवल व निव्वळ मूल्यवृद्धी मध्ये राज्याचा वाटा अनुक्रमे १६.९ टक्के, १७.१ टक्के व २०.३ टक्के होता. उद्योगांचे निवडक निर्देशांक बाजुच्या तक्त्यामध्ये दाखवलेले आहेत.
survay 3

निव्वळ मूल्यवृद्धीच्या बाबतीत २०१२-१३ मध्ये १) कोळसा, शुद्ध पेट्रोलियम यांची उत्पादने (२५.४ टक्के) २) यंत्रे व यंत्रसामुग्री, दुरूस्ती व उभारणी (१२.४ टक्के) ३) रसायने आणि रासायनिक उत्पादने (८.६ टक्के) आणि ४) औषधे, औषधी द्रव्ये आणि वनस्पतीजन्य उत्पादने (६.८ टक्के) हे प्रमुख उद्योग होते. या उद्योग गटांचे २०१२-१३ मध्ये निव्वळ मूल्यवृद्धी मधील प्रमाण ५३.२ टक्के होते. तर स्थिर भांडवलातील प्रमाण २० टक्के होते.
राज्यातील २०१२-१३ मधील प्रति कारखाना स्थिर भांडवलातील गुंतवणूक आणि निव्वळ मूल्यवृद्धी यांचे मूल्य मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे २८.९ व ८.५ टक्क्यांनी जास्त आहे. महत्त्वाचे निर्देशांक बाजुच्या तक्त्यांप्रमाणे.survay Image

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division