१०३ वर्षांपूर्वीचे पहिले डेस्क वेट ‘टाटा स्टील’च्या ताब्यात

tata steel first steel rail sotheby auctionभारतीय पोलाद उद्योगातील महत्त्वाचा टप्पा ठरलेले ‘डेस्क वेट’ हे आपले पहिले उत्पादन ‘टाटा स्टील’ने नुकतेच लंडनमध्ये लिलावात खरेदी केले. जमशेदपूर येथे १९१२ मध्ये भारतातील पहिले पोलादी रेल्वे रूळ तयार करताना त्याच्याच एका तुकड्यातून हे डेस्क वेट तयार करण्यात आले होते.
ब्रिटनमध्ये या डेस्क वेटचा लिलाव झाला. टाटा स्टीलने १९१२ मध्ये जमशेदपूर येथील प्रकल्पामध्ये हे डेस्क वेट तयार केले होते. यावर ‘फर्स्ट रेल रोल्ड फ्रॉम टाटा स्टील’ ही अक्षरे कोरण्यात आली असून, ‘टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड, १८ मार्च, १९१२’ हा मार्कही आहे. रॉबर्ट क्रॉ-मिल्नेस या स्कॉटलंडच्या पहिल्या राजांना ही वस्तू भेट देण्यात आली होती. ही वस्तू त्यानंतर स्कॉटलंडच्या राणीच्या भारतातून जमा केलेल्या संग्राह्य वस्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. हे वेट लिलावात विकत घेतल्याचे टाटाने जाहीर केले असले, तरी या लिलावामध्ये मोजलेली किंमत मात्र कंपनीने जाहीर केलेली नाही. ही वस्तू लवकरच जमशेदपूरमध्ये आणण्यात येणार असून तेथील सेंटर फॉर एक्सलन्स येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहितीही कंपनीतर्फे देण्यात आली. १९०७ मध्ये आशियातील पहिली पोलाद कंपनी म्हणून स्थापन झालेली टाटा स्टील ही जगातील दुसर्या क्रमांकाची कंपनी असून २६ देशांमध्ये कंपनीचे उत्पादन, तर ५० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय सुरू आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division