‘आयएफआरएस’ अंमलबजावणीचे फायदे

‘आयएफआरएस’च्या अंमलबजावणीचे भारताला अनेक फायदे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अकाउंटिंगच्या नियमांचे पालन केल्याने अकाउंटिंगमधील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. परदेशी वित्तीय संस्था भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतात, त्या वेळी ‘आयएफआरएस’वर आधारित माहितीचा अधिक उपयोग होईल. याशिवाय भारतीय कंपन्यांना परदेशी शेअर बाजारात नोंदणी करून घेणे यामुळे सोपे होईल. वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांच्या अकाउंटिंगमध्ये सुसूत्रता असल्यामुळे इतर देशांतील कंपन्या ‘टेकओव्हर’ करण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक आकडेवारीची उपलब्धता सहज होईल. थोडक्यात, अकाउंटिंग या विषयाची एकूणच गुणवत्ता वाढण्यास मदत होऊन दोन देशांमधील वेगवेगळ्या कंपन्यांचा तुलनात्मक अभ्यास करणे सोपे होईल, या निमित्ताने या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांनादेखील मागणी वाढेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division