फ्युचर - भारती सहकार्य

बिर्ला समूहातील वस्त्र विक्री क्षेत्रातील कंपन्यांचे एकाच कंपनीत विलीनीकरण झाल्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. किरकोळ विक्री क्षेत्रातील आघाडीच्या फ्युचर समूहातील फ्युचर रिटेल स्पर्धक भारती रिटेलमध्ये सहभागी करण्यास उभय कंपन्यांची मान्यता मिळाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले.

हा व्यवहार ९५० ते १,४५० कोटी दरम्यान झाला असल्याची शक्यता आहे. या विलिनीकरणाला आता भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी आवश्यक ठरेल. उभयतांची आता २४३ शहरांमध्ये ५७० दालन संख्या होणार आहे.

किशोर बियाणी यांच्या फ्युचर समूहातील फ्युचर रिटेल ही किरकोळ विक्री क्षेत्रातील उपकंपनी आहे. किरकोळ विक्रीऐवजी केवळ घाऊक बाजारात अमेरिकी कंपनी वॉलमार्टबरोबर भागीदारी कायम ठेवणाऱ्या भारती रिटेलने किरकोळ विक्री व्यवसायासाठी फ्युचर समूहाच्या माध्यमातून अन्य भागीदार निवडला आहे. याद्वारे फ्युचर व भारती, रिलायन्स रिटेलचा एकत्रित सामना करतील.

भारती रिटेलने अन्य एका स्वतंत्र निर्णयानुसार तिच्या रिटेल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय नवा भागीदार फ्युचर रिटेलमध्ये विलीन केला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division