'एडलगिव्ह-माणदेशी फाउंडेशन’चा रोख पत पुरवठा

md logo whiteएडलवाइज वित्त समूहाची सेवाभावी शाखा असणार्‍या एडलगिव्ह फाउंडेशनने माणदेशी बँक या भारतातल्या महिलांसाठीच्या पहिल्या ग्रामीण बँकेचा भाग असणार्‍या माणदेशी फाउंडेशनच्या सहयोगाने ग्रामीण महिलांसाठी दैनंदिन रोख पत पुरवठा योजना राबविली आहे. या उपक्रमातील सातारा जिल्ह्यातील आठ उद्यमशील महिला लघु उद्योजकांचा मुंबईत नुकताच गौरव करण्यात आला.

'दैनंदिन रोख पतपुरवठय़ामुळे ग्रामीण महिलांना नियमित उत्पन्न मिळण्याची शाश्वती मिळते. शिवाय त्यामुळे महिला ग्रामीण यंत्रणेचा एक महत्वपूर्ण भाग बनतात' असे एडलगिव्ह फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या शहा यांनी यावेळी सांगितले. तर माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष चेतना सिन्हा यांनी माणदेशी बँकेने २ लाख महिलांना आर्थिक सहाय्यता दिल्याची माहिती दिली. पकी ७० हजारांहून अधिक महिला यशस्वी उद्योजक असल्याचेही सांगितले. २०२५ पर्यंत माणदेशी संस्थेने १० लाख ग्रामीण महिला उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य राखले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division