वर्ष अखेरीपर्यंत खारकोपर ते उरण लोकल धावणार!

trainनोव्हेंबर २०१८मध्ये नेरूळ-उरण मार्गावरील पहिल्या टप्प्यात नेरूळ तेखारकोपर या मार्गावर लोकल धावली. या मार्गात नेरूळ, सीवूड्स दारावे, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारखोपर ही रेल्वे स्थानके आहेत. त्यामुळे या परिसरातील चाकरमान्यांना मोठा दिलाहा मिळाला आहे. खारखोपरपासून पुढे गव्हाण, न्हावाशेवा, रांजणपाडा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वेस्थानके आहेत. गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम पहिल्या टप्प्यातील रेल्वेच्या कामाच्या वेळीच पूर्ण झाल्यात जमा होते. त्यामुळे गव्हाणपर्यंत ही लोकल जाईल, नेरूळ-उरण रेल्वेचा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रखडला होता.आता सुरु असलेल्या नेरूळ-उरण रेल्वेमार्गावरील सर्व कामे करून घेण्यासाठी रेल्वे आणि सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी रात्रंदिवस कामगार काम करत असून अनेक काम आता अंतिम टप्प्यात येत आहेत. सुरुवातीला अंदाजे ५०० कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचा खर्च आता जवळजवळ १,७८२ कोटींवर पोहोचला आहे. या रेल्वेमार्गाची लांबी २७ किलोमीटर आहे.

या पूर्ण मार्गावर एकूण ७ लहान पूल उभारण्यात आले आहेत. त्याचे काम पूर्ण झाले असून दोन्ही दिशेने रेल्वे रूळ बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर विद्युत विभागाचे काम हाती घेतले जाईल. पाच रेल्वे स्थानकांचे कामही होत आले आहे. त्यामुळे या मार्चपर्यंत काम पूर्ण होण्याची पूर्वी डेडलाइन ठेवण्यात आली होती. मात्र अनेक लहान सहन कामे, रूळ जोडण्यांसह इतर संबंधित कामांना वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाखेरची डेडलाइन रेल्वेने निश्चित केली आहे. नव्याने होणाऱ्या विमानतळाच्या निमित्ताने उलवे आणि त्यापुढे उरणपर्यंत लोकवस्तीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळेच प्रवासाचा प्रमुख पर्याय ठरणाऱ्या नेरूळ ते उरण या लोकलसेवेची प्रवासी वाट पाहत आहे. या मार्गावरील पहिला टप्पा असलेल्या नेरूळ ते खारकोपरच्या प्रवासाची सुरुवात झाली असून त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता हा संपूर्ण मार्ग सुरू होण्याची असलेली प्रतीक्षा या वर्षाखेरपर्यंत संपणार आहे.

DEASRA MUV ADVT