पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार

Petrol Pumpआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने येत्या काळात पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजीवाढणारअसल्याचे वृत्त समोर येत आहे.
येत्या काळात पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजी वाढणार असल्याचे असे चित्र दिसत आहे. पेट्रोलचा दर ८० रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. तर, डिझेलच्या दरातही वाढ होणार आहे. डिझेलचा दर ६५ रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झाली आहे. २०१५ सालानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरल झाली आहे.