मोबाईल इंटरनेट सेवा सुरु किंवा बंद करण्यासाठी '1925'चा पर्याय

mobile data reमोबाईलची इंटरनेट सेवा बंद किंवा सुरू करण्यासाठी सप्टेंबरपासून हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. 1925 या टोल फ्री क्रमांकावर मोबाईलधारकाला फोन करून किंवा एसएमएस पाठवून या सेवेचा फायदा घेता येईल.

इंटरनेट शुल्काबाबत ग्राहकांकडून दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ट्रायने ग्राहकांच्या सोयीसाठी हा पर्याय दिला आहे. START , STOP अशा शब्दांचा वापर करून ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावर एसएमएस पाठवता येईल किंवा फोन करूनही ही सेवा सुरू किंवा बंद करता येईल.