पुण्यात वाहनांचा सुळसुळाट

भारत हा सध्या जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. हे आता आपल्या देशातील तसेच जगातील सर्वांनाच माहिती आहे. मात्र जगातील दुचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठही भारत आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ही बाब लक्षात आली आहे. जगाचा विचार करता भारतात सर्वाधिक दुचाकी वाहने विकली जातात यामध्ये पुण्याचा नंबर पहिला लागतो. आता याचा अभिमान बाळगायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवावे.

या पाहणीत गेल्या चार वर्षांचा विचार करण्यात आला आहे. (2014 ते 2018) यामध्ये असे लक्षात आले की पुणे, चेन्नई, बंगलोर, दिल्ली आणि मुंबई (नवी मुंबई व ठाणे धरून) या शहरात दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. एक हजार प्रवाशांमागे पुण्यात 2014- 15 मध्ये 261 दुचाकी वाहने होती ती २०१५-१६ मध्ये 275, 2016-१७ मध्ये २८९ तर 2017- 18 मध्ये 301 पर्यंत पोचली आहे. चेन्नई 2017- 18 मध्ये हेच प्रमाण 298 इतके आहे. म्हणजे पुण्यात व चेन्नईत फारसा फरक नाही. सगळ्या वाहनांचा एकत्रित विचार केला तर पुण्यातील वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे चित्र विदारक असले तरी वास्तव आहे.

जगभरातील एकूण वाहाने आणि जगाची लोकसंख्या यांचा जर विचार केला तर हे चित्र सुद्धा असेच काहीसे दिसेल. सध्या जगाची एकूण लोकसंख्या 7.7 बिलियन म्हणजे सातशे कोटी पेक्षा अधिक आहे. यात चीन पहिल्या क्रमांकावर (साधारण 135 ते 140 कोटी) सन २०३० मध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

सर्व प्रकारच्या वाहनांचा विचार केला तर दरवर्षी जगभरात सहा कोटी वाहनांची नव्याने भर पडत असते तर लोकसंख्या 83 मिलीयन म्हणजे 8.3 कोटीने वाढत असते याचा अर्थ असा लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यांच्या वाढीत स्पर्धा सुरू आहे. लोकसंख्या नियंत्रणाचे असंख्य कार्यक्रम जगभरात चालू आहे त्याला काही प्रमाणात यश येत आहे. चीनने आपल्या लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे यामुळे काही वर्षात आपण पहिल्या क्रमांकावर जाणार आहोत हे जरी खरे असले तरी लोकसंख्यावाढीचा वेग काही अंशी मंदावला आहे.
वाहनांच्या बाबतीत मात्र असे काही चित्र दिसत नाही यांच्या वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे याचे उदाहरण वर नमूद केलेच आहे (पुणे याचे उत्तम उदाहरण) पेट्रोल/डिझेलच्या वाढत्या किमती त्यामुळे होणारे प्रदूषण तसेच या इंधनाचा साठा काही वर्षं संपणार असे बोलले जात असले तरी वाहनांची संख्या घातलेली नाही. त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार बाजारात येत आहेत. म्हणजेच पेट्रोल/डिझेल/सीएनजी/वाहनांच्या जोडीला इलेक्ट्रिक कार/दुचाकी यांची भर पडणार आहे. वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. तो वाढणारच आहे. याच्यावर नसबंदी करण्याची वेळ आली आहे इतकेच म्हणणे आपल्या हातात आहे.

- प्रसाद घारे

DEASRA MUV ADVT