कमोडीटी एक्सचेंज (MCX) च्या कामकाजाची उकल

photoउदय तारदाळकर यांचा गुंतवणूक आणि अर्थ क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. त्यात नुकतीच मल्टि कमोडीटी एक्सचेंज (MCX Limted) च्या तक्रार निवारण समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे . त्या विषयाला अनुसरून त्यांच्याशी केलेली ही बातचीत

१.भारतात इक्विटी आणि कमोडिटी एक्सचेंजमध्ये येणाऱ्या तक्रारीच स्वरूप काय असते? आणि त्याचे निराकरण कुठल्या पद्धतीने करतात?
भांडवली आणि कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदारांच्या तक्रार निवारणासाठी ‘सेबी’ने ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा सुरु केली आहे आणि त्यामुळे तक्रारींचा निपटारा करण्याचा वेग वाढला आहे. आलेल्या तक्रारी नियोजित एक्सचेंजेसकडे पाठविल्या जातात .
येणाऱ्या तक्रारी मुख्यत्वे खालील प्रकारच्या असतात:
१) एक्सचेंजच्या सदस्यांकडून कागदपत्रांची पुर्तता न होणे .
2) विना संमती व्यवहारांची अंमलबजावणी.
3) ट्रेडिंग मेंबर / उप दलाल यांनी लावलेली जास्तीची दलाली
४ ) निधी / सिक्युरिटीज किंवा वस्तूंचा ताबा न मिळणे.
५ ) ट्रेडिंग मेंबरला दिलेले सिक्युरिटी डिपॉझिट / मार्जिन न मिळणे.
६_कॉर्पोरेट फायदे (लाभांश / व्याज / बोनस इत्यादी न मिळणे.
७) हिशोबाच्या स्टेटमेंट प्रमाणे जमा शिल्लक न मिळणे.
८) मार्जीन / संभाव्य फरक म्हणून ठेवलेले निधी / सिक्युरिटीज न मिळणे.
सर्व तक्रारींचे पंधरा दिवसात निवारण करणे एक्सचेंजेसना बंधनकारक असते अन्यथा ह्या तक्रारी गुंतवणूक तक्रार निवारण समितीकडे पाठविल्या जातात. दाव्याची रक्कम २५ लाखापर्यंत असल्यास समितीच्या कोणत्याही एका सदस्याकडे ही तक्रार पाठविली जाते. दाव्याची रक्कम २५ लाखापेक्षा जास्त असल्यास समितीचे तीन सभासद ह्या तक्रारीचानिपटारा करतात. सदस्यांची नेमणूक ही संगणकांनुसार असते आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही.
एक्सचेंजचा गुंतवणूकदार सेवा विभाग काही विशिष्ट प्रकारच्या तक्रारींचे निवारण करु शकत नाही. ज्यांमध्ये इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेस सेल लक्ष घालू शकत नाही अशा तक्रारींची स्पष्टीकरणात्मक यादी खालीलप्रमाणे:
एक्सचेंज सदस्यांविरुध्द तक्रारी-
१) व्यवहार जे आधीच लवाद प्रक्रियेचा विषय आहेत त्या संबंधीच्या तक्रारी.
२) ट्रेडिंग मेंबर्स सोडून इतर व्यक्ती यांना दिलेले निधी आणि निधी / सिक्युरिटीज किंवा वस्तूंचा ताबा यांचा समावेश असलेल्या तक्रारी.
३) मानसिक त्रास / पिळवणूक, छळवणूक आणि प्रकरण गुंतवणूक तक्रार निवारण समितीकडे नेण्यासाठीचा खर्च यासंबंधीच्या मागण्या / दावे / तक्रारी.
४) प्रतिकात्मक तोटा, वाद चालू असलेल्या काळात किंवा धंदयाचा (ट्रेड) संधी वाया जाणे या संबंधीच्या मागण्या / दावे / तक्रारी.
५) व्यवहाराची अंमलबजावणी एक्सचेंजच्या ट्रेडिंग सिस्टीम नुसार न झाल्याच्या तक्रारी
६) उप दलाल / अधिकृत व्यक्तींच्या ट्रेडिंग मेंबर्स बरोबर केलेल्या खासगी व्यापारी व्यवहारांसंबंधी केलेल्या मागण्या / दावे / तक्रारी.
७) व्यवहार जे कर्ज, पतपुरावठा करण्याच्या स्वरुपात असतात जे एक्सचेंजने नेमून दिलेल्या चौकटीमध्ये नसतात, त्या संबंधीच्या मागण्या / दावे / तक्रारी.

२. भांडवली आणि कमोडिटी एक्सचेंजमध्ये व्यवहार करताना कुठची सावाधानगिरी बाळगली पाहिजे?
गुंतवणूकदारांनी केवळ सेबीची मान्यता असलेल्या स्टॉक एक्सचेंजमार्फतच व्यवहार करणे आवश्यक आहे.
काही ठळक गोष्टी खालील प्रमाणे :
केवळ सेबीकडे नोंदविलेल्या मध्यस्थांमार्फतच व्यवहार करणे.
दलालाजवळ खाते उघडण्यासंदर्भातील सर्व आवश्यक उपचारांची पूर्तता करणे.
नो युवर क्लायंट''(KYC) कराराची विचारणा करणे व त्यावर सही करणे.
कोणताही व्यवहार करण्यापूर्वी सिक्युरिटीज््मधील गुंतवणूक करण्याबाबत असलेल्या जोखमी वाचून समजून घेणे.
तुमचा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणुकीच्या जोखीम-परताव्याबाबतची माहिती तसेच त्यांची रोखीत रुपांतर होण्याची सुलभता व सुरक्षे बाबतच्या सर्व बाबी पडताळून पाहणे.
व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या दलालाला सर्व संबंधित प्रश्न विचारून विचारा आणि तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून घेणे.
सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली सर्व माहिती लक्षात घेऊन कंपनीची मूल्ये आणि वाजवी कारणांवर आधारित गुंतवणूक करणे.
तुमच्या दलाल/ उप -दलाल/डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट यांस निःसंदिग्ध सूचना देणे.
तुमच्या प्रत्येक व्यवहाराच्या कराराची मागणी करणेआणि करारनाम्यामधील सर्व तपशील पावतीशी त्वरित पडताळून पाहणे. कोणतीही शंका असल्यास तुमच्या व्यवहाराचे एक्सचेंजच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सर्व तपशीलांशी पुन्हा पडताळून पाहणे.
डिमॅट संबंधित :
डीपॉझिटरी पार्टिसिपन्ट कडून मिळणाऱया डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लीप्स (डीआयएस) बुक काळजीपूर्वक हाताळा. तुमचा डीआयएस क्रमांक हा आधीच छापलेला असावा आणि तुमचा खाते क्रमांक (क्लायन्ट आयडी) हा आधीच मुद्रांकित असावा असा आग्रह धरा.
जर तुम्ही नेहमी व्यवहार करत नसाल तर तुमच्या डिमॅट खात्याकरता दिलेल्या फ्रीजिंग सवलतीचा वापर करा.

सर्वसाधारण सभांमध्ये भाग घ्या आणि स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत मतदान करा.
सिक्युरिटीजमध्ये बाजाराबाहेरील म्हणजे ऑफ मार्केट व्यवहार करु नये आणि
नोंदणी नसलेल्या मध्यस्थांबरोबर व्यवहार करु नये .
अवास्तववादी परताव्यांच्या वचनांना बळी पडू नका.
ऐकीव माहिती आणि अफवांवर विसंबून गुंतवणूक करु नका आणि गुंतवणुकीमध्ये
अंतर्भूत असलेल्या संभाव्य जोखमी गृहित धरण्यास विसरु नका.
अचानक व्यापाराच्या व्यापामध्ये किंवा किंमतींमध्ये आलेली उसळी किंवा माध्यमांमध्ये प्रसृत झालेले अनुकूल लेख अथवा कथा यांनी प्रभावित होऊन मुळातच असुरक्षित किंवा अस्थिर कंपन्यांमध्ये खरेदी करु नका.
समूहामागोमाग जाऊ नका किंवा क्षणैक प्रभावाखाली येऊन व्यवहार करु नका.
तुमच्या संशय/तक्रारींचे निवारण करण्याकरता योग्य त्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्यास संकोच अथवा चालढकल करु नका.
तुमच्या डिमॅट खात्याच्या सही केलेल्या कोऱया डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लीप्स (डीआयएस) वाटेल तशा कोठेही ठेवू नका.
कोऱया डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लीप्स (डीआयएस) सही करु नका आणि त्या तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (डीपी) किंवा दलालाकडे केवळ त्रास वाचविण्याकरता ठेवू नका.
डेरिव्हेटिव्ज्
सर्व नियम, ठराव, पोटनियम आणि एक्सचेंजेसनी उघड केलेली सर्व माहिती नीट वाचा.
सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रेडिंग मेंबर (टीएम) मार्फत किंवा एक्सचेंजकडे नोंदणी झालेल्या टीएमच्या अधिकृत व्यक्तीमार्फतच व्यवहार करा.
अधिकृत व्यक्तीबरोबर व्यवहार करताना, करारचिठ्ठी ही अधिकृत व्यक्तीच्या दलालाने जारी केली आहे याची खात्री करा.
अधिकृत व्यक्तीबरोबर व्यवहार करताना, दलाली/सर्व रकमांचा भरणा/ मार्जिन इ. दलाला कडेच भरावीत.
प्रत्येक अंमलात आलेल्या व्यवहाराकरता तुम्हांस तुमच्या दलालाकडून योग्यरित्या सही केलेली, व्यवहारांचे सर्व तपशील ठळकपणे दर्शविणारी व तुमचा वैशिष्टय़पूर्ण क्लायन्ट आयडी नमूद केलेली करारचिठ्ठी तुम्हांला मिळाल्याबाबतची खात्री करा.
दलाला कडे मार्जिनकरता जमा केलेल्या अनुषंगिक रकमेची म्हणजेच कोलॅटरलची पावती घ्या आणि तुमचे हक्क आणि कर्तव्य तसेच टीएम/क्लिअरिंग मेंबरचे हक्क आणि कर्तव्य जाणून घ्या. तुमच्या बाजारातील स्थितीबाबत असणाऱया जोखमीची तसेच त्यावरील मार्जिन कॉल्सबाबत जागरुक रहा.

३. तक्रार निवारण केंद्र (ग्रीव्हनसेस सेल) च्या कामाचे स्वरूप कश्या प्रकारचे असते.
सर्व तक्रारींचे पंधरा दिवसात निवारण करणे एक्सचेंजेसना बंधनकारक असते अन्यथा ह्या तक्रारी गुंतवणूक तक्रार निवारण समितीकडे पाठविल्या जातात. दाव्याची रक्कम २५ लाखापर्यंत असल्यास समितीच्या कोणत्याही एका सदस्याकडे ही तक्रार पाठविली जाते. दाव्याची रक्कम २५ लाखापेक्षा जास्त असल्यास समितीचे तीन सभासद ह्या तक्रारीचानिपटारा करतात. सदस्यांची नेमणूक ही संगणकांनुसार असते आणि त्यात कोणाचाही हस्तक्षेप चालत नाही. सर्वसामान्यपणे प्रत्येक तक्रारीसाठी ९० मिनिटांचा अवधी दिला जातो ज्यात वादी आणि प्रतिवादीबरोबर समन्वय साधून तक्ररीचे निवारण त्यांना आवश्यक असते . ह्या प्रक्रियेत " तारीख पे तारीख" असे वेळकाढू धोरण चालत नाही.

४. भांडवली आणि कमोडिटी एक्सचेंज मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळू शकते?
गुन्तवणूकदारांच्या तक्रारींचा निपटारा चान्गल्या तर्हेने झाल्यास एक प्रकारची विश्वसार्हता निर्माण होते. सेबीने त्याबाबतीत एक आंतरराष्ट्रीय मानक निर्माण केले आहे. परदेशी संस्थांची अव्याहत गुंतवणूक हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे.
५. भांडवली आणि कमोडिटी एक्सचेंज च्या संदर्भात सामान्य गुंतवणूकदारांना तुम्ही काय सुचना कराल?
खालील गोष्टी करणे व टाळणे आवश्यक आहे.
टाळा
रिस्क डिस्क्लोजर डॉक्युमेंटस्् म्हणजेच जोखीम उघड करणारी कागदपत्रे तुम्हांला पूर्ण समजल्याशिवाय डेरिव्हेटिव्ज््मध्ये व्यवहार करण्यास सुरुवात करु नका.
कोणत्याही प्रॉडक्टशी जोडलेल्या जोखीम आणि मोबदल्याबाबतची माहिती घेतल्याशिवाय त्याबाबतचा व्यवहार करु नका.

सेबीकडे नोंदणी असलेल्या दलाल/पोट-दलालांशीच व्यवहार करा.
दलाल/पोट-दलालांकडे सेबीचे विधीग्राहय़ नोंदणी सर्टिफिकेट असल्याची खात्री करा.
दलाल/पोट-दलालास बाजारात व्यवहार करण्याची परवानगी असल्याची खात्री करा.
तुमच्यावतीने मागणी नोंदविणाऱया दलाल/पोट-दलालांस स्पष्ट सूचना दया.
कामास सुरुवात करण्यापूर्वी दलाल/पोट-दलालाने क्लायन्ट नोंदणी अर्जावर सही करण्याचा आग्रह धरा.
तुमच्या दलाल/पोट-दलालाबरोबर सर्व अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद केलेला करार करा.
प्रत्येक दिवशी केलेल्या व्यवहाराची कराराचिठ्ठी/कन्फर्मेशन मेमो मिळण्याचा आग्रह धरा.
प्रत्येक सेटलमेंटकरता बिलाचा आग्रह धरा.
प्रत्येक करार चिठ्ठीवर दलालाचे नाव, व्यवहारांची वेळ व संख्या, व्यवहाराची रक्कम आणि दलाली हे स्पष्टपणे नमूद केले असल्याची खात्री करा.
ठराविक मुदतीनंतर तुम्हांस स्टेटमेंट ऑफ अकाउंट मिळण्यावर भर दया.
भरणा केल्यापासूनच्या 48 तासांच्या आत तुम्हाला भरण्याची पावती/ डिलीव्हरी मिळण्याची खात्री करा.
कोणताही वाद असल्यास दलाल/पोट-दलाल यांचेकडे, ते सभासद असलेल्या स्टॉक एक्सचेंजकडे आणि सेबीकडे वाजवी मुदतीत लेखी तक्रार दाखल करा.
पोट-दलालाबाबत वाद असता मुख्य दलालास वादाबाबत जास्तीत जास्त 6 महिन्यांचे आत कळवा.
कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी स्टॉक एक्सचेंजेस/सेबीने जारी केलेले सर्व नियम, नियमावली आणि परिपत्रके यांची नीट माहिती करुन घ्या.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division