संपादकीय

DAC MUV PIC

'महाराष्ट्राचे उद्योग विश्व' हे मासिक राज्यातील उद्योग जगताला वाहिलेले आहे व उद्योग जगताशी निगडित अनेक मुद्द्यांची, विषयांची चर्चा ह्यामध्ये व्हावी अशी अपेक्षा आहे.

गेल्या काही दिवसातील बातम्यांकडे किंवा TV चॅनल वरील चर्चांकडे नजर टाकली तर ह्या राज्यातील लोकांना आपल्या नोकरी-व्यवसाय, उद्योगधंदा, ह्यापेक्षा आपली जात व तिच्या भोवती उभारलेले अस्मितेचे मिथक ह्यातच जास्त रस आहे कि काय असे वाटू लागते. आज लोक आपल्या जातीचे झेंडे राजरोसपणे खांद्यावर मिरवू लागले आहेत. म्हणजे आम्हाला शाळेत 'जात पात मानू नका' असे कळकळीने सांगणारे शिक्षक खुळेच म्हणायचे तर !

गेल्या तिमाहीत देशाचा GDP वाढीचा दार थोडासा वाढला आहे व त्यामुळे उद्योग जगतात थोडे चैतन्य आले आहे हे खरे आहे. म्हणजे नोटबंदी व GST च्या अंमलबजावणीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल ही भीती आता नाही हे नक्की. दुसरे म्हणजे आता आपली अर्थव्यवस्था हळूहळू का होईना पण वाढत आहे. 'उद्योग करण्यातील सुलभता' ह्यातील देशाचे नामांकन वाढले आहे. नुकतेच जागतिक बँकेने भारताची अर्थव्यवस्था ह्या आर्थिक वर्षात ७.3 टक्क्यांनी वाढेल व पुढील काही वर्षात ह्याही पेक्षा जास्त दराने वाढती राहील असे भाकीत केले आहे. मात्र ह्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा फायदा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचेल तसेच रोजगार निर्मिती सुद्धा होईल ह्याची जबाबदारी सरकारची आहे. एकूणच उद्योग जगताला २०१८ साल हे २०१७ पेक्षा चांगले जाईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.

असे सर्व असताना आपण भलत्याच विषयाच्या नादी लागून हातची संधी घालवली तर आपल्या सारखे कर्मदरिद्री आपणच !

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division