महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

MACCIA Logo photoमहाराष्ट्राच्या आर्थिक घडामोडींशी समरस असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर या मध्यवर्ती संस्थेची 9 दशकांची वाटचाल संपून शताब्दीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र चेंबरच्या भविष्यकालीन वाटचालीच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात पार पडले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी आपल्या स्वागतपर निवेदनात गेली 3 वर्ष राज्याला स्थिर, कल्पक आणि कार्यक्षम सरकार दिल्याबद्दल मुख्यमंत्री व मंत्री मंत्रिमंडळाचे विशेष अभिनंदन केले. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रासारख्या उपक्रमातून उद्योग वाढीस चालना देणे, उद्योग सुलभता प्रत्यक्षात आणणे यासाठी त्यांचे अभारही मानले.
महाराष्ट्राचा उद्योग आघाडीवर सातत्याने अग्रक्रम रहावा याकरीता महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त प्रयत्नातून महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन आयोजित करण्याबाबत त्यांनी आवाहनही केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याच्या कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतीले. तसेच उद्योग विकासासाठी महाराष्ट्र चेंबरने विशेष कल्पना व प्रकल्प सुचवावेत म्हणजे त्यावर विचार करता येईल. महाराष्ट्र सरकार व्यापर-उद्योग व शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबरच्या नेहमी बरोबर राहिल असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division