सामुहिक प्रोस्ताहन योजना

SurceySurceySurcey महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७-१८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

राज्याचे विविध उपक्रम
८.2 देशातील तसेच परदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे नेहमीच प्रथम पसंतीचे राज्य राहिले आहे. हे समजून उद्योग क्षेत्र सक्षम करण्यासाठी राज्याने वेळोवेळी या क्षेत्रात विविध सुधारणा राबवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. खालील धोरणे व्यावसायिक वातावरण सुधारण्याच्या उद्देशाने आखली असून त्याद्वारे राज्यातील उद्योग क्षेत्र सर्वसमावेशक वृद्धीने वाटचाल करेल.
*औद्योगिक गुंतवणुकीमध्ये राज्याचे अग्रस्थान राखण्याकरिता केंद्रित औद्योगिक धोरण
*सर्व मंजूर या एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरिता गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी योजना
*ग्रामीण उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणास चालना देण्यासाठी काथ्या उद्योग धोरण
*विद्युत वाहन व त्यांचे भाग यांच्या उत्पादनांमध्ये राज्यास अग्रस्थानी ठेवण्यास व त्यांच्या निर्यातीस चालना देण्यासाठी विद्युत वाहन उत्पादन धोरण
*राज्यातील फिनटेक क्षेत्रास चालना देण्याच्या उद्देशाने फिनटेक धोरण
*सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्याकरिता स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी अवकाश व संरक्षण उत्पादन धोरण
*कपास क्षेत्राचे बळकटीकरण रेशीम लोकर क्षेत्राचे पुनरुज्जीवन आणि अपारंपारिक सूत व हरित ऊर्जा चालना देण्यासाठी सृजनशील दृष्टिकोन याकरिता वस्त्रोद्योग धोरण
*किरकोळ व्यापार क्षेत्रात राज्याचे अग्रस्थान उंचावण्याकरिता किरकोळ व्यापार धोरण
*राज्याचे माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान/सहायभूत सेवा क्षेत्रातील अग्रस्थान कायम राखण्याकरितां माहिती तंत्रज्ञान धोरण
*जागतिक स्पर्धेत टिकाव धरू शकतील असे इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली डिजाईन व उत्पादन उद्योग राज्यांमध्ये निर्माण करण्याकरिता इलेक्ट्रॉनिक्स धोरण
*औद्योगिक समूह/मुक्त व्यापार साठवण क्षेत्र/किनारपट्टी आर्थिकक्षेत्र विकास करण्यास प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र बंदर विकास धोरण
*सामाजिकदृष्ट्या वंचित गटांच्या उद्योजकतेला औद्योगिक वाढीचा मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याकरिता अनुसूचित जाती-जमाती उद्योजकता धोरण
*कृषी उद्योगाविषयी व्यवहारांसाठी जैव तंत्रज्ञान धोरण
*अतिरिक्त आर्थिक गतीविधींना उत्तेजना देण्याकरिता विशेष आर्थिक क्षेत्र धोरण

8.2.1 राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध सुधारणा प्रदर्शित करण्याकरीता तसेच गुंतवणूक आकर्षित करण्याकरिता व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता फेब्रुवारी 2018 मध्ये नागरिक महाराष्ट्र कन्वर्जन्स 2018 ही जागतिक गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत रु12.07 लाख कोटींची गुंतवणूक असलेले व 36.77 लाख प्रस्तावित रोजगार असलेले 4108 प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
8.2.2 कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये स्टार्टअप हे भविष्यातील व्यवसायांचे बीज आहे. त्यामुळे वर्तमानकाळातील नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देणे व त्यांचे संवर्धन करणे खूप महत्त्वाचे आहे. या उपक्रमांची क्षमता जाणून घेऊन, मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स 2018 स्टार्ट-अप अवार्ड सुरू करून या अंतर्गत असे उपक्रम ओळखणे, जाणणे व त्यांना प्रोत्साहित करणे याकरिता शासन सक्रिय सहभागाची भूमिका बजावत आहे. अशा प्रकारे देण्यात आलेल्या प्रोत्साहनामुळे राज्यातील आर्थिक घडामोडी वृद्धिंगत होण्यास मदत होईल. तसेच उपक्रमांच्या नवनिर्मिती मुळे व अस्तित्वात असलेल्या उपक्रमांचा दर्जा उंचावल्यामुळे नोकऱ्या व रोजगारांची निर्मिती होऊन सर्वसामान्य जनतेमध्ये ज्ञान व सृजनशीलतेची पातळी वाढेल.
8.2.3 अलिकडे राज्यात महिला उद्योजक धोरण 2017 हे विशेष धोरण जाहीर केले आहे. देशात अशा प्रकारचे महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महिला उद्योजक धोरण 2017 ची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
• महिला उद्योजकांचा सक्रिय सहभाग आस प्रोत्साहन देणे
• महिला परिचालित उद्योगांचे प्रमाण सध्याच्या 9 टक्यांिल वरून 20 टक्या्टे पर्यंत वाढवणे
• आश्वासक व्यावसायिक वातावरण निर्माण करणे
• तांत्रिक, परिचालात्मक तसेच आर्थिक सहाय्य पुरवून महिलांना रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे

chart feb 2019

DEASRA MUV ADVT