जेएसडब्ल्यूची कच्च्या पोलाद निर्मितीबाबत विक्रमाची नोंद

jswजेएसडब्ल्यू स्टील या १२ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल असलेल्या जेएसडब्ल्यू समूहाच्या व्यवसाय विभागाने कच्च्या पोलाद निर्मितीबाबत विक्रमाची नोंद केली आहे. सर्वाधिक मासिक, तिमाही तसेच वार्षिक उत्पादनाबाबत कंपनीने अव्वल स्थान मिळवले आहे.जेएसडब्ल्यू समूहाचे अस्तित्व पोलाद, उर्जा, पायाभूत सोयीसुविधा, सिमेंट, व्हेंचर्स आणि खेळ या क्षेत्रात आहे.जेएसडब्ल्यू स्टील ही भारतातील सर्वात आघाडीची एकात्मिक अशी स्टील कंपनी असून कंपनीचा १८ एमटीपीए क्षमतेचा पोलाद उत्पादन प्रकल्प हा कर्नाटकातील विजयानगर येथे कार्यान्वित आहे.