एअर इंडियाच्या हवाई शाखेची विक्री सुरू, कंपनीचे चार भाग करणार

air india flightनिर्गुंतवणूक प्रक्रियेत एअर इंडियाचे (एआय) चार भाग करण्यात येणार असून, चारही भागांची स्वतंत्रपणे विक्री करण्यात येणार आहे. यातील एअरलाइनआर्म म्हणजे हवाई वाहतूक शाखा सर्वप्रथम विक्रीस काढण्यात येणार आहे.

र्गुंतवणूकीच्या प्रक्रियेत एअर इंडियाचे चार भाग करण्यात येणार असून, चारही भागांची स्वतंत्रपणे विक्री करण्यात येणार आहे. यातील म्हणजे हवाई वाहतूक शाखा सर्वप्रथम विक्रीस काढण्यात येणार आहे.एअर इंडियावर ७0 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, ते कंपनीच्या चारही विभागांवर विस्तारलेले आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, एअर इंडियाचे एआय-एआय एक्स्प्रेस-एआय सॅटस, ग्राउंड हँडलिंगयुनिट, इंजिनीअरिंगयुनिट आणि अलायन्स एअर, असे चार भाग करण्यात येतील. यातील एअरलाइनआर्मच्या विक्रीसाठी दोन आठवड्यांत निविदा जारी होतील. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने इतर विभागांना विक्रीसाठी खुले केले जाईल.
सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाचा एअरलाइनआर्म हाच प्रामुख्याने दृश्य विभाग आहे. इतर विभाग लोकांना माहितीही नसतात. हा दृश्य विभाग अधिक गुंतागुंतीचाही असल्याने, विक्रीसाठी जरा कठीण आहे. त्यामुळे त्याची पहिल्यांदा विक्री करण्यात येईल.

एअर इंडियाच्या एअरलाइनआर्मसाठीइंडिगोने औपचारिक प्रस्ताव दिला आहे. एअर इंडियाचा आंतराष्टÑीय व्यवसाय आणि एआय एक्स्प्रेस यांच्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. टाटा सन्स-सिंगापूर एअर लाइन्सच्या जेव्ही विस्तारा कंपनीनेही खरेदीत रस दर्शविला आहे. याशिवाय एका विदेशी कंपनीनेही खरेदीचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. हिस्सेदारी खरेदी करण्याचा अधिकार आहे.जेटसारख्या काही कंपन्या तूर्त दुरून लक्ष ठेवून आहेत. कंपनीची नेमकी किती किंमत लागते, व्यवहार कसा होईल, याची माहिती घेण्यासाठी त्यांना दस्तावेजांची प्रतीक्षा आहे. कतार एअरवेजचे सीईओअकबर अल बाकेर यांनी भारतात विमान कंपनी सुरू करण्याचे मनसुबे अलीकडेच जाहीर केले आहेत. परंतु कंपनीकडून याबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप आलेला नाही.


15 व्या वेतन आयोगाचे कामकाज एप्रिलपासूनसुरु होणार

पंधराव्या वित्त आयोगाने आपे कामकाज एप्रिल पासून सुरु करण्याचे ठरवले आहे. या आयोगाला चार मुद्द्यांवर काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे. वित्त आयोगाने आपल्याकडून प्रथमच सेस आणि सरचार्जचे कायदेशीर बंधन, त्याचे करण व त्याच्या भूमिकेवर कायदेशीर चौकट तयार करण्याचे ठरवले आहे.
वित्त आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्याने नमूद केले की याचे कायदेशीर बंधन आहे का हे प्रथम पहिले जाईल.कायद्याच्या चौकटीत आहे का याची खात्री केली जाईल. त्याच बरोबर हेही पहिले जाईल की ज्या उद्देशांसाठी तो लागू केला आहे त्याचा उपयोग होत आहे का त्याची फेरतपासणी केली जाईल.

डोनियर इंडस्ट्रीजला विश्वसनीय पॉवरब्रांड म्हणून सन्मानितकेले
डोनियर इंडस्ट्रीज लिमिटेडला ७० मोस्टट्रस्टेड पॉवर ब्रॅण्डस या शीर्षकाने सन्मानित केले.

पॉवरब्रांड मुंबई समिटचे नुकतेच मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळीडोनियरचे कार्यकारी संचालक अजय अग्रवाल यांना विश्वसनीय पॉवरब्रांड या पुरस्काराने गौरवले गेले.याप्रसंगीअग्रवाल यांनी सांगितले की, मी या संधीचा लाभ घेऊन आमच्या ग्राहकांना, व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांना, चॅनेल भागीदार आणि तसेच हितचिंतकांचे आभार मानतो आणि हा विश्वास आहे की हे ग्राहक आणि पुरवठादार यांच्यातील विश्वासार्हतेला निश्चितपणे आणखी मजबूत करेल पॉवर ब्रॅण्डसअशाप्रकारे एक विशिष्ट उपक्रम आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division