सहकार
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१५-१६ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...
राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात, विशेषतः रोजगार निर्मिती आणि सामाजिक ऐक्य साधण्यात, सहकार चळवळ विशेष व महत्त्वाची म्हुमिका बजावते. ही चळवळ सुरुवातीला कृषि पतपुरवठा क्षेत्रापुरती मर्यादित होती परंतु कालांतराने ती अकृषि पतपुरवठा, कृषि प्रक्रिया व पणन, उद्योग, कामगार, वाहतुक, इ. क्षेत्रांमध्ये जलदगतीने पसरली. तथापि, जागतिकीकरणानंतर या क्षेत्रास बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करावी लागणारी स्पर्धा, व्यावसायिक कौशल्यांचा अभाव, साधनसंपत्तीची मर्यादा, इ. सारख्या गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. याकरीता राज्य शासनाने सहकारी संस्थांवर संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्ति संचालक नेमणे, भ्रष्टाचाराचे आरोप होऊन सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले असल्यास त्यांना पुढील दोन कालावाधींसाठी निवडणूक लढविण्यास बंदी, कामगिरीवर आधारित पुरस्कार, इ. निर्णय घेतले आहेत.
राज्यात ३१ मार्च, २०१५ सोजी सुमारे २.२६ लाख सहकारी संस्था कार्यरत होत्या व त्यामध्ये सुमारे ५३९.३० लाख सभासद होते. दृष्टीक्षेपात सहकारी संस्था खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत
व दशवार्षिक मालिका खालील तक्त्यामध्ये दिली आहे.