सोनं आणि चांदीच्या दरांचा उच्चांक

Gold silverआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात तब्बल २ टक्क्यांची वाढ झाली असून ते १,६११ डॉलर्स प्रति औंस पोहोचलं आहेत. तर चांदीच्या दरानंही उच्चांक गाठला असून ती १८.८० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचली आहे. सोन्याच्या दरानं गेल्या सात वर्षातील उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे देशातही सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला असून चेन्नईमध्ये सोन्याच्या दरानं (२४ कॅरेट) ४२ हजार ८६० रूपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात ५.५ टक्क्यांची वाढ झाली असून या आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. घरगुती बाजारपेठेत चांदीच्या दरांनी उच्चांक काढला असून ते ४८ हजार ८७५ रूपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
घरगुती बाजारपेठेत एका दिवसात १० ग्राम सोन्याच्या दरात ४५० रूपयांची तर गेल्या दहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रूपयांची वाढ झाली आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात होत असते. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली घसरणही सोन्याच्या दरवाढीमागील कारण असल्याचं जाणकारांच्या निदर्शनास आल आहे. चेन्नईमध्ये सोन्याच्या दरानं ४२ हजार ८६०, कोलकात्यात ४१ हजार ७८० तर अहमदाबादमध्ये ४१ हजार ६३०, दिल्लीत ४१ हजार २८० आणि मुंबईत ४१ हजार १५० रूपयांचा टप्पा गाठला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division