स्टील उद्योगाचे सर्वेसर्वा शांतीलाल पित्ती कालवश

steelजालन्यात स्टील उद्योगाची मुहूर्त मेढ महेंद्र रि रोलिंग मिल या नावाने रोवणाऱ्या शांतीलाल पित्ती यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले.
त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अवघ्या दोन लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर सुरू केलेला एसआरजे स्टील उद्योग समूहाने गेल्या ४८ वर्षात एक हजार कोटी रूपयांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे.
पूर्वी पित्ती परिवाराचा जालना ट्रान्सपोर्ट या नावाने वाहतूकीचा व्यवसाय होता. १९७१ मध्ये रोटी, कपडा और मकान या त्रिसुत्रीला स्टील उद्योगात त्यांनी लक्ष घातले. तेव्हापासून आजपर्यंत या उद्योगास ते आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वेगवेगळे तंत्रज्ञान आणून उद्योगाचा विकास केला. १९८४ मध्ये एसआरजे या नावाने उद्योग उभारला. यामध्ये पूर्वी कार्बन, मॅगनीज, फॉस्फरसचा वापर करून स्टीलची निर्मीती केली जात होती. परंतु, पुढील पिढीने या व्यवसायाची जवाबदारी सांभाळली. त्यांनी या स्टील कारखान्यात आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून पूर्वी कोळशावर चालणारी थर्मेस कोलकत्ता येथून ८५ लाख रूपये खर्च करून आणली. तेव्हापासून एसआरजे स्टीलच्या उत्पादन आणि दर्जात लक्षणीय वाढ झाली. १९९२ मध्ये पुन्हा फर्नेस मध्ये बदल करून फ्रान्स येथून ५० मे. टन उत्पादन करणारी ही भट्टी एसआरजे स्टीलमध्ये कार्यान्वित करण्यात आली. दररोज ५० मे. टन उत्पादनातून उद्योगाची वार्षिक उलाढाल ४०० कोटी रूपयांवर पोहोचली होती. ती आज एक हजार कोटी रूपयांच्या घरात पोहचली त्यासाठी शांतीलाल पित्ती यांची दूरदृष्टी महत्वाची होती. एकूणच जालना जिल्ह्यातील उद्यमशिलतेला चालना देण्यासाठी या परिवाराचा आणि विशेष करून शांतीलाल पित्ती यांचा यात सिहांचा वाटा होता.

DEASRA MUV ADVT