स्पाइस जेटच्या नफ्यात मोठी घट

spicejetखासगी विमानसेवा कंपनीतील स्पाइस जेटच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये स्पाइस जेटचा नफा ७७ टक्क्यांनी घटून ५५ कोटी रुपयांवर आला आहे. कच्च्या इंधनदरातील ३४ टक्क्यांची वाढ व रुपयाच्या अवमूल्यनामुळे नफ्याचे प्रमाण कमी झाले, असे या कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या प्रवासी भाड्याच्या उत्पन्नात मात्र आठ टक्क्याने वाढ झाली आहे.

DEASRA MUV ADVT