राष्ट्रपतींच्या ग्रीस दौर्यात संतोष मंडलेचा सहभागी

07a922a0afe94f8c5d787f7ae41dda68भारत आणि ग्रीस या दोन्ही देशातील व्यापार व उद्योग संबंध दृढ व्हावेत याकरता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जून मध्ये ग्रीस दौरा ठरवण्यात आला. उद्योगाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण व्हावी भारतात उद्योगामध्ये गुंतवणूक वाढावी याशिवाय काही सामंजस्य करार करण्यात यावेत या दृष्टीने या दौर्याच आयोजन करण्यात आल आहे. कोविंद यांच्या समवेत जाणारया शिष्ट मंडळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरलचे अध्यक्ष संतोष मंडेल यांचा सहभाग होता. यांसह ललित गांधी, अनिलकुमार लोढा, भावेशमाणेक, मनप्रीतनेगी, जयेश ओस्वाल, श्रीकृष्ण गोसावी, राजन ठक्कर यांचा समावेश आहे. ग्रीस- भारताच्या या भेटीमध्ये आयटी, फार्मासुटिकल,शिपिंग, पर्यटन, कृषी, स्थावर मालमत्ता, संरक्षण, ऊर्जा या क्षेत्रात असलेल्या व्यापार उद्योगाच्या संधीबाबत चर्चा होणार आहे.