आयडीबीआय बँकेचे जैन रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर

jainरिझव्‍‌र्ह बँकेतील डेप्युटीगव्हर्नरपदी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बँक क्षेत्रातून नियुक्त करण्यात येणाऱ्या पदाकरिता जैन यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर जैन हे पुढील तीन वर्षांसाठी असतील.
रिझव्‍‌र्ह बँकेत सध्या विरल आचार्य, एन. एस. विश्वनाथन आणि बी. पी. कांगो हे तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत. जैन हे आयडीबीआय बँकेत मार्च २०१७ पासून व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील आहेत. तीन दशकांचा अनुभव असलेल्या जैन यांनी यापूर्वी इंडियन बँकत वरिष्ठ जबाबदारी हाताळली आहे.