जिओजित फायनान्शिअल सर्विसेस ला
मार्च १८ अखेर तिमाहीत रु.१९/- करोडचा नफा !

1528124609full२०१७-१८ आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत जिओजित फायनान्शिअल सर्विसेस ला निव्वळ नफ्यात २६% ची वाढ होऊन हि रक्कम रु.१९.२८/- करोड आहे.एकत्रित महसूल २०% ने वाढला असून हि रक्कम रु. ९५.६६/- करोड आहे. २०१७-१८ आर्थिक वर्षात निव्वळ नफा ३१% ने वाढला असून रु. ७३.२४/- करोड आहे. महसुलात २०% ची वाढ होऊन हि रक्कम रु. ३६७.९५/- करोड आहे.मार्च १८ अखेर आर्थिक वर्षात कंपनी रु. ३८,६००/- करोड च्या मालमत्तेचे व्यवस्थापन करीत आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात ९०,००० नवे क्लायंट मिळवले आहेत.