टीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप

eco01 1बाजार भांडवल अत्युच्च टप्प्याच्या जानेवारी-मार्च २०१८या कालावधीत सरस कामगिरी करीत ४.४ टक्क्यांच्या घरात निव्वळ नफा कमावतानाच, आगामी आर्थिक वर्षांत महसुली वाढीचे उत्तम संकेत देणाऱ्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)च्या समभागाने शुक्रवारच्या भांडवली बाजारातील मलूल व्यवहारात ७ टक्क्यांनी झेप घेतली. परिणामी टीसीएसचे बाजार मूल्य १०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या वेशीवर अर्थात साडेसहा लाखांहून अधिक पातळीवर पोहोचले. असा टप्पा गाठणारी ती भारताच्या बाजारात पहिलीच कंपनीच असेल.
टाटा समूहातीलटीसीएसने कंपनीने आपले वित्तीय कामगिरीचे निष्कर्ष जाहीर केले. देशातील सर्वात मोठय़ा सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपनीने मार्च तिमाहीत ६,९०४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे स्पष्ट केले. कंपनीने आपल्या भागधारकांना एकास एक बक्षीस समभाग आणि प्रति समभाग २९ रुपयांचा लाभांशही जाहीर करून, वर्षभरात लाभांशापोटी नजराणा प्रत्येक समभागामागे ५० रुपयांवर नेला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division