भारती इन्फ्राटेल-इंडस टॉवर्सचे एकत्रीकरण

mobile towerविलीनीकरणानंतर एकत्रित कंपनी इंडस टॉवर्स लिमिटेड या नावाने ओळखली जाईल.
एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या स्पर्धक कंपन्यांनी एकत्र येत भारती इन्फ्राटेल आणि इंडस टॉवर्सचे एकत्रीकरण आणि त्यायोगे देशव्यापी अस्तित्व असलेल्या महाकाय दूरसंचार मनोरे कंपनीच्या उदयाचा मार्ग मोकळा केला आहे. देशातील सर्व २२ परिमंडळांतील १.६३ लाख दूरसंचार मनोऱ्यांसह २५,३६० कोटी रुपयांचा महसूल या एका संयुक्त कंपनीच्या छताखाली येणार आहे. चीननंतर भारतात या रूपाने प्रथमच एक मोठी दूरसंचार मनोरे कंपनी निर्माण होत आहे.विलीनीकरणानंतर एकत्रित कंपनी इंडस टॉवर्स लिमिटेड या नावाने ओळखली जाईल. शिवाय तिची भांडवली बाजारातील सूचिबद्धताही कायम राहणार आहे. विलीनीकरण व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती उभय कंपन्यांकडून कळविण्यात आली.
दूरसंचार क्षेत्राच्या आखाडय़ात रिलायन्स जिओच्या सप्टेंबर २०१६ मधील प्रवेशाने भडकलेल्यादरयुद्धाचा व्यावसायिक फटका प्रस्थापित कंपन्यांना बसत असून, त्याचा मुकाबला म्हणून टाकले गेलेले हे पाऊल मानले जात आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division