गुजरातमध्ये जगातला सर्वात मोठा ‘गॅस क्रॅकर’ प्रकल्प

relianceनैसर्गिक वायूचे उत्खनन करून त्याचे शुद्धीकरण करताना उरणाऱ्या अवक्षेपाचे (रेसिड्यू) अणु विघटन करून पेट्रोरसायनांच्या निर्मितीसाठी त्याचा पुनर्वापर करणारा ‘गॅस क्रॅकर’ प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने नुकताच कार्यान्वित केला. गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात आलेला हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा रिफायनरी ‘ऑफ गॅस क्रॅकर’ प्रकल्प असल्याचा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजने केला आहे.

जगभरात ऊर्जा व पेट्रोरसायन प्रकल्पांचा विस्तार करण्याचा संकल्प रिलायन्स इंडस्ट्रीजने सोडला आहे. हा रिफायनरी ऑफ गॅस क्रॅकर प्रकल्प त्याचाच एक भाग आहे. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कंपनीने नमूद केले आहे की, जगातील सर्वात मोठ्या असलेल्या या प्रकल्पाची क्षमता वार्षिक १.५ दशलक्ष टन आहे. यासाठी लागणारा ऑफ गॅस कच्चा माल जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दोन शुद्धीकरण कारखान्यांतून येणार आहे.

गॅस क्रॅकर प्रकल्प शुद्धीकरण प्रकल्पाला जोडल्यामुळे खर्चात बचत होणार आहे. त्याचबरोबर आखाती देश व उत्तर अमेरिका येथे कार्यरत असलेल्या क्रॅकर प्रकल्पांना थेट स्पर्धा निर्माण होणार आहे. या रिफायनरी ऑफ गॅस क्रॅकरची रचना लवचिक असून उर्जेची बचत करणारी आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे क्रॅकर प्रकल्प महाराष्ट्रात नागोठणे येथे तर गुजरातमध्ये हाजिरा, दहेज व वडोदरा (बडोदा) येथे कार्यरत आहे. यामध्ये सुधारणा करून या नव्या क्रॅकरची बांधणी करण्यात आली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division