मोबाइल नेटवर्कविना कॉल शक्य?

maxresdefaultदूरसंचार नियामक ‘ट्राय’ने नुकतीच ‘इंटरनेट टेलिफोनी’ला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच घरातील, कार्यालयातील किंवा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या वायफाय नेटवर्कवरून कोणत्याही मोबाइलवर अथवा लँडलाइनवर नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करता येणे शक्य होणार आहे. ‘ट्राय’च्या मते सध्या उपलब्ध असणाऱ्या लायसन्सच्या पद्धतीनुसार इंटरनेट टेलिफोनी सेवा स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जाऊ शकते.

इंटरनेट टेलिफोनी ही सेवा अतिशय सुविधाजनक आणि स्वस्त दरात उपलब्ध होईल, असे ‘ट्राय’ला वाटते. ही सेवा प्रत्यक्षात आल्यास कॉल सक्सेस रेटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, असा विश्वासही ‘ट्राय’ने व्यक्त केला आहे. विशेषकरून ज्या भागांमध्ये खराब नेटवर्क किंवा लो नेटवर्क असेल, तेथे ही सेवा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या शिवाय जेथे पुरेशा प्रमाणात इंटरनेटची सुविधा आहे, मात्र नेटवर्क प्राप्त होत नाही तेथेही इंटरनेट टेलिफोनी वरदान ठरण्याची शक्यता आहे. सध्या दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ‘ट्राय’च्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मात्र, ‘ट्राय’च्या मते ही सेवा सुरू झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांना कॉल करण्याचा आणखी एक सुलभ आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहे.

मोबाइल कंपन्यांचा विरोध

सध्या कार्यरत असणाऱ्या कंपन्या आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) यांनी मात्र, इंटरनेट टेलिफोनीच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते ही सेवा सुरू झाली तर, व्हॉइस सेवेच्या महसुलावर मोठा परिणाम होईल. त्यांच्यानुसार इंटरनेट टेलिफोनी पब्लिक नेटवर्कवर उपलब्ध करून दिल्यास ज्या कंपन्या सध्या व्हॉइस कॉलिंगची सेवा देतात, त्यांना मोठे नुकसान होईल. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व प्रकारच्या व्हॉइस सेवा इंटरनेटकडे वळतील. सध्या देशातील स्मार्टफोनधारकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे एसएमएस आणि व्हॉइस ट्रॅफिक आधारीत अॅप सेवा अन्यत्र वळत आहेत. याचा सर्वस्वी परिणाम म्हणून मोबाइल सेवा पुरवठादारांच्या महसुलात मोठी घट झाली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division