पुस्तके १२ टक्क्यांनी महागणार

book price high for gstलेखकाच्या मानधनावरील जीएसटीचा वाद देशभर सध्या पेटत आहे. हे मानधन व त्यावरील जीएसटी हा प्रकाशकासाठी खर्च आहे. जीएसटी लागू झाल्यामुळे प्रकाशन व्यवसायाच्या खर्चात भर पडली आहे. प्रकाशकांनी दिलेल्या माहितीनुसार पुस्तकांच्या किंमती जीएसटी लागू झाल्यामुळे १० ते १२ टक्के वाढतील, असे तथ्य समोर आले आहे.

या अनुषंगाने ज्योत्स्ना प्रकाशनाचे मिलिंद परांजपे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘लेखकाच्या मानधनाचा खर्च हा निर्मिती खर्चात मोडत नाही. तरीही त्याचा बोजा प्रकाशकावरच पडणार आहे. पुस्तकाची छापील किंमत १२० रुपये गृहित धरली, त्याच्या लेखकाला दिली जाणारी रॉयल्टी १० टक्के धरली आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल, असे गृहित धरले तर प्रकाशकाचा मानधनावरील जीएसटीचा खर्च एक हजार प्रतींसाठी २१६० रुपयांनी वाढणार आहे. हा वाढीव खर्च मूळ खर्चाच्या ७.६५ टक्के आहे.’

विक्री किंमत १२० रुपये असलेल्या शंभर पानी पुस्तकाच्या एक हजार प्रतींचा निर्मिती खर्च पूर्वीच्या मूल्यवर्धित करासह (व्हॅट) २८ हजार २४४ रुपये होता. तो आता जीएसटी लागू झाल्यामुळे वाढून २९ हजार ४१४ रुपये होणार आहे, याकडेही परांजपे यांनी लक्ष वेधले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division