‘बीआयए’च्या अध्यक्षपदी जीनानाथ शेट्टी यांची निवड

BIA logoशहरातील व्यापारी, व्यावसायिक तसेच अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, चर्मोद्योग, रबर, प्लास्टिक्स, धातू, पॅकेजिंग व वस्त्रोद्योगाशी संलग्न हजारो उद्योगपतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन (बीआयए)’च्या अध्यक्षपदी जीनानाथ शेट्टी यांची एकमताने निवड घोषित करण्यात आली.

वांद्रे कुर्ला संकुलात ४०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या वार्षिक सभेत, मावळते अध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी नवे अध्यक्ष म्हणून शेट्टी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो बिनविरोध मंजूर करण्यात आला. युनिटॉप केमिकल प्रा. लि.चे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले शेट्टी यांनी सध्याची आर्थिक परिस्थितीत सदस्यांनी अधिकाधिक डिजिटल आणि रोकडरहित व्यवहारांच्या दिशेने बदलाला चालना देणे काळाची गरज असल्याचे सांगितले. आगामी वर्षांपासून लागू होत असलेल्या वस्तू व सेवा कर प्रणालीतून व्यवसाय व उद्योगांपुढे निर्माण होणारी आव्हानांचे समाधान व अनुरूप फेरबदलासाठी मदत करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division