रिझव्र्ह बँकेकडे नोटांचा पुरेसा साठा – अर्थमंत्री
निश्चलनीकरणाच्या नियोजित कालावधीनंतर पुरतील एवढय़ा नोटा रिझव्र्ह बँकेकडे आहेत; नोटांचा तुटवडा पडणार नाही, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे.
मध्यवर्ती बँकेकडून नोटा वितरीत केल्या गेल्या नाहीत असा एकही दिवस गेलेला नाही, अजूनही नोटा चलनात आणल्या जातील, असे जेटली यांनी नमूद केले. ते म्हणाले, की रिझव्र्ह बँकेकडे नोटांचा पुरेसा साठा आहे. तो ३० डिसेंबरनंतरही पुरणार आहे. चलनात नेमक्या किती नोटा आहेत असे विचारले असता त्यांनी सांगितले, की ३० डिसेंबरनंतर ते कळेल व जाहीर केले जाईल. जे चलन छापले गेले आहे ते टपाल कार्यालयांना आणि बँकाना पाठवले आहे. जमा झालेल्या बाद नोटा व वितरीत नवीन चलनाच्या गणनात काही दुहेरी गोष्टींमुळे चुका होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.