‘पी-नोट्स’ गुंतवणूकीला निश्चलनीकरणाचा फटका

P Notesविदेशी गुंतवणूकदारांना सुलभ पर्यायी मार्ग असलेल्या ‘पी-नोट्स’मार्फत होणारी भांडवली बाजारातील गेल्या महिन्यातील गुंतवणूकीने गेल्या ३३ महिन्यांचा तळ गाठला आहे. भारतातील निश्चलनीकरणाचा फटका या गटालाही बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विदेशी गुंतवणूकदारांना नाममात्र प्रक्रियेसह कोणत्याही नोंदणीशिवाय या माध्यमातून भांडवली बाजारात, सूचिबद्ध कंपन्यांच्या समभाग तसेच रोखे आदींमध्ये गुंतवणूक करण्याचा ‘पी-नोट्स’ हा लोकप्रिय गुंतवणूक प्रकार आहे. मात्र ऑक्टोबरमधील १,९९,९८७ कोटी रुपयांच्या तुलनेत गेल्या महिन्यात या प्रकारातील त्यांची गुंतवणूक १,७९,६४८ कोटी रुपये झाली आहे.

यापूर्वी, सप्टेंबर, ऑगस्ट व जुलै महिन्यांमध्ये ही गुंतवणूक २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिली आहे. जूनमध्ये ही गुंतवणूक २ लाख कोटी रुपयांवर राहिली असली तरी त्यात आधीच्या महिन्याच्या तुलनेत किरकोळ घसरण नोंदली गेली होती.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division