निमा शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

nimaनिमा शिष्टमंडळाने दि. ११ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. जनरल मोटर्स व फॉक्सकॉन या कंपन्यांकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत फक्त पुणे- मुंबईचा पट्टा हाच गुंतवणुकीसाठी देण्यास येणार आहे. 'मेक-इन-महाराष्ट्र' अंतर्गत महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे.

यासंदर्भात वरील कंपन्यांकडून करण्यात येणार्‍या गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीचे केंद्र म्हणून नाशिकचा विचार करण्यात यावा. तसेच याबातीत नाशिक शहरास दुय्यम स्थान देण्यात येत असल्याची भावना नाशिक मधील उद्योजकांत आहे. जमीन, पाणी, कुशल मनुष्यबळ, इतर शहरांशी असलेल्या दळणवळणाच्या सुविधा शिवाय अलीकडेच एम.आय.डी.सी. ने अधिग्रहित केलेल्या जमिनी या अनुकूल बाबींचा विचार करता नाशिक हे गुंतवणुकीचे आदर्श स्थान आहे. अशा गुंतवणुकीद्वारे इतर शहरांप्रमाणेच नाशिकच्या औद्योगिक विकासास निश्चितच गती मिळेल अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप भेटी दरम्यान उपस्थित होते. ही भेट घडवून आणण्यात आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमाताई हिरे यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division