'शेअरखान’वर 'बीएनपी पारिबा’चा ताबा

sharekhan bnpदीड दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या व देशातील तिसर्‍या क्रमांकाची दलाल पेढी बनलेल्या ’शेअरखान’वर फ्रान्सच्या ’बीएनपी पारिबा’ने ताबा मिळविला आहे. हा व्यवहार २००० कोटी रुपयांचा झाला असण्याची शक्यता आहे.

भारतीय भांडवली बाजारात सल्लागाराच्या भूमिकेचा विस्तार करताना 'बीएनपी पारिबा'ने 'शेअरखान'चे सर्व, १०० टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. विलीनिकरणानंतर 'शेअरखान' ही यंत्रणा भारतातील व्यवसाय म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत असेल; समभाग तसेच म्युच्युअल फंड, अन्य बचत योजनांची विक्री शेअरखानमार्फत कायम असेल, असे 'बीएनपी पारिबा'च्या भारतातील व्यवसायाचे प्रमुख जो रिस डिरक्स यांनी म्हटले आहे.