गुगलच्या प्रमुखपदी सुंदर पिचई

google android chrome sundar pichai 812x420लोकप्रिय शोध संकेतस्थळ गुगलच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्यांना सध्या अनेक जागतिक कंपन्यांची नेतृत्वधुरा सांभाळणार्‍या भारतीय वंशांच्या तंत्रज्ञाच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे.

गेल्या वर्षीच नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट या दोन जागतिक कंपन्यांवर अनुक्रमे राजीव सुरी आणि सत्या नाडेला यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणार्‍या भारताच्या शिरपेचातील हे मानाचे तुरे व मनोबल उंचावणार्‍या निश्चितच आहेत.