डबेवाल्यांपुढे आता 'स्टार्टअप्स'चे आव्हान

startupsपारंपरिक डबेवाल्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांनाच आव्हान देणारी दमदार मोटरसायकलची सवारी करणार्‍या आणि गुगल मॅपच्या आधाराने पत्ता शोधून काढणार्‍या स्मार्ट रायडर्सची फौज बडय़ा शहरातून उभी राहात आहे. मुंबई-पुण्यात 'ग्रॅब डॉट इन' तर, देशात इतरत्र युअरगाय यासारख्या तरुणांकडून सुरू केलेल्या स्टार्टअप्स आता गरजूंना दुपारचा डबा वेळेत पोहोचविण्यासाठी सरसावल्या आहेत.

मुंबई, पुण्यात पाय बर्‍यापैकी जमविलेली ’ग्रॅब’ ही तयार खाद्यान्न ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची अ‍ॅपद्वारे संचालित अनोख्या सेवेची संकल्पना आहे. अनेक उपाहारगृहांकडे त्यांचे खाद्यपदार्थ ग्राहकांना घरपोच पोहचविणारे यंत्रणा नाही. अशांना ग्रॅबसारख्या अल्पमोबदल्यात व सत्वर सेवा खूपच उपयुक्त ठरत असल्याचे आढळून येते. काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बरोबरी दिसणार्‍या रेडिओ टॅक्सी व कॅबसारखाच हा बदल असून, नेमक्या त्याच धर्तीवर बनविलेल्या ग्रॅबच्या मोबाइल अ‍ॅपमधून ८०० राइडर्सचे हे सेवा जाळे विविध उपाहारगृहे व फूड चेन्ससाठी कार्यरत झाले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division