'जनरल मोटर्स'चे उत्पादन तळेगावमधूनच, गुजरातमधील कारखाना बंद

genral motorsदेशातील बाजारपेठेतील स्थान उंचावण्यासाठी 'जनरल मोटर्स' या बड्या कंपनीने ६,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे अलिकडेच जाहीर केले. तसेच, गुजरातमधील हलोल येथील मोटारनिर्मितीचा कारखाना बंद करून यापुढील देशातील सर्व उत्पादन तळेगाव येथूनच करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

तळेगाव येथे ‘जनरल मोटर्स‘चा कारखाना आहे. पुढील पाच वर्षांत ‘शेव्हरोलेट‘चे दहा नवी मॉडेल बाजारात आणणार आहेत. या गाड्यांचे उत्पादन तळेगाव येथे होईल. यासंदर्भात ‘जनरल मोटर्स‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले.

१९९६ पासून भारतामध्ये असलेल्या ‘जनरल मोटर्स‘ला आतापर्यंत २,७४० कोटी रुपयांचा तोटा झाला. पुढील पाच वर्षांमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात भारत हा अमेरिका आणि चीननंतरचा तिसर्‍या क्रमांकाचा देश ठरेल, असा अंदाज आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मेरी बॅरा यांनी गेल्या वर्षीच्या भारत दौर्‍यामध्ये या बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले होते.