मुंबईत "फॉक्‍सकॉन‘तर्फे आंतरराष्ट्रीय मीडिया लॅब

WWI Logo Squareसिनेनिर्माते सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूडस इंटरनॅशनल या चित्रपट संस्थे "फॉक्‍सकॉन‘तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाची मीडिया लॅब सुरू करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध अत्याधुनिक साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाची माहिती या मीडिया लॅबद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. जुलैमध्ये "फॉक्‍सकॉन‘चे अध्यक्ष गाऊ यांनी व्हिसलिंग वूडला भेट दिली होती. या भेटीदरम्यान, त्यांनी संस्थेला मीडिया लॅब तयार करून देणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. त्याबाबतच्या सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.

सध्याच्या आकडेवारीनुसार 2030 पर्यंत इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची आयात कच्च्या तेलापेक्षा पुढे जाईल. तसेच परकीय चलनाची बचत होईल. त्यामुळे या सामंजस्य कराराला महत्त्व आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division