'इरॉस' आता डिजिटल मनोरंजनाच्या क्षेत्रात

K8Bl W1rचित्रपट निर्मिती आणि वितरणातील 'इरॉस इंटरनॅशनल' या कंपनीने'इरॉसनाऊ'द्वारे ऑनलाइन मनोरंजनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सुमारे १६० कोटी रुपयांची  गुंतवणूक या उपक्रमासाठी कंपनीने केली आहे.

इरॉस नाऊवर मनोरंजन जगतातील ताज्या घडामोडी, टीव्ही शो, म्युझिक व्हिडीओ आणि ऑडियो ट्रॅक्सचा मोठा संग्रह असेल, ज्यातून एक चित्रपट निर्मिती करणार्‍या स्टुडिओ ते डिजिटल कंपनी म्हणून संक्रमण घडून येईल, असा विश्वास इरॉस इंटरनॅशनलच्या समूह कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका ज्योती देशपांडे यांनी व्यक्त केला.

इरॉसनाऊने प्रारंभिक टप्प्यातच सुमारे १.९ कोटी नोंदणीकृत सभासद मिळविले आहेत. चालू वर्षांत या उपक्रमावर आणखी २५ दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीचे नियोजन असल्याचे या न्यूयॉर्क शेअर बाजारस्थित कंपनीने स्पष्ट केले आहे. अलीकडे दूरचित्रवाणीवर दर्जेदार कार्यक्रमाची वानवा असताना, जनसामान्यांचा मनोरंजनाची भूक ही स्मार्टफोनद्वारे भागविली जात असून, हीच इरॉसनाऊसाठी मोठी व्यवसायाची संधी ठरेल, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division