टोयोटाच्या ७,१२९ कोरोला माघारी

toyota 625x300 71423024917सदोष एअर बॅग असलेल्या सेदान श्रेणीतील ७,१२९ कोरोला कार टोयोटाने माघारी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. टोयोटा या जपानी कंपनीची कोरोला ही प्रीमियम गटातील प्रवासी कार आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने या कोरोला कारची एप्रिल २००७ ते जुलै २००८ दरम्यान निर्मिती केली आहे. त्यातील प्रवासी आसनाच्या बाजूच्या एअर बॅगमध्ये दोष आढळल्यानंतर कंपनीने माघारीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. टोयोटाने यापूर्वीही २०१३ मध्ये निवडक कोरोला परत घेतल्या होत्या. सदोष एअर बॅगबाबत यापूर्वी जपानी बनावटीच्या निस्सान, होंडा या कंपन्याही चर्चेत आल्या होत्या.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division