'खोळंबलेले प्रकल्प त्वरेने मार्गी लागायला हवेत!' – डॉ.राजन

indias uncompleted projectsदेशाचे आर्थिक स्वास्थ्यात सुधार असल्याचे निश्चित म्हणता येईल, पण जोमदार वाढीसाठी सरकारने ठोस आर्थिक सुधारणा राबविणे आणि विशेषत: खोळंबलेल्या प्रकल्पांच्या अडचणी त्वरेने दूर करायला हव्यात, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजन यांनी देशातील विद्यमान अर्थस्थिती चिकित्सक वेध घेणारे भाष्य केले. निर्यात आघाडीवरील घसरण ही जरी मूलत: जागतिक अर्थव्यवस्थेतील मरगळीने असली तरी गंभीर चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्था ही स्थिरपणे पण अविरत उभारीच्या प्रक्रियेतून जात आहे पण यापेक्षा अधिक वेगाने ही प्रक्रिया घडण्यासाठी सरकारकडून सातत्यपूर्ण प्रयत्न व्हायला हवेत. तसेच रखडलेल्या अनेक प्रकल्पांपुढील अडथळे दूर केले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी सरकारकडून व्यक्त केली.
देशातून घसरता निर्यात व्यापार हा तुलनेने कमजोर दुवा असल्याचे स्पष्टपणे नमूद करून राजन म्हणाले, "निर्यातीतील कमजोरीने अनेक आशियाई अर्थव्यवस्थाही ग्रस्त आहेत. कदाचित चीनचा याला अपवाद असेल. जागतिक अर्थव्यवस्थेतील नरमाई हे याचे प्रमुख कारण निश्चितच आहे.'

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division