CPhI - औषध कंपन्यांचे जागतिक अधिवेशन

- मकरंद गोखले

 

201512815163969519

आपण औषधे बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाचे उत्पादक किंवा फिनिश प्रॉडक्ट्स उत्पादक आहात का? आपणास आपली उत्पादने जगभरातील बाजारपेठेत विकावयाची आहेत का? आपण नवीनतम औषधांसंबंधी आणि मशीन्ससंबंधी माहिती करुन घेऊ इच्छिता का? आपल्या तांत्रिक समस्यांना सोपे उपाय प्राप्त करून घेऊ इच्छिता का? तर मग CPhI (Convention of Pharmaceutical Ingredients) हे एकच ठिकाण असे आहे की जेथे अनेक खरेदीदार आणि विक्रेते एकाच छताखाली येतात. UBM ही बी 2 बी तत्वावर अधिवेशने भरविणारी किंवा त्यांचे आयोजन करणारी जगातील आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. UBN गेली २६ वर्षे सलग एकामागून एक अशी निरनिराळ्या देशात CPhI ची अधिवेशने भरवित आहे. २०१६ हे CPhI प्रदर्शनाचे भारतातले १० वे वर्ष. दर वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा मुंबईत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात CPhi P-MEC प्रदर्शन भरले होते. परंतु या वर्षी हा कार्यक्रम तीन दिवस नाही तर १७ ते २३ नोव्हेंबर असे तब्बल सात दिवस होता आणि तेसुद्धा बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव आणि एमएमआरडीए मैदान, बीकेसी, बांद्रा अशा दोन ठिकाणी.

औषधे बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाचे उत्पादक आणि त्यांचा उपयोग करून फिनिश प्रॉडक्ट्स बनविणाऱ्या कंपन्यांना एकत्र आणण्याचे काम UBM सातत्याने आणि यशस्वीरित्या करीत आहे. या प्रकारची अधिवेशने किंवा प्रदर्शने भरविल्यामुळे अनेक उत्पादक आणि ग्राहकांच्या गाठी भेटी एकाच छताखाली होणे सहज साध्य होते आणि त्यामुळे दोघांचे व्यवसाय अति कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे होण्यास मदत होते.

agenda cphiindia 3x1दर वर्षी जगभरातील नऊ शहरांमध्ये भव्य प्रदर्शने भरवून त्या ठिकाणी निरनिराळ्या विषयांवर व्याख्याने, परिषदा, सेमिनार तसेच पुरस्कार असा तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असतो. आपली कंपनी यापैकी कोणताही कार्यक्रम स्पॉन्सर करू शकते किंवा स्टॉल घेऊन आपली उत्पादने प्रदर्शनार्थ ठेऊ शकते. तुमच्या व्यवसायिक गरजा पूर्ण करेल असा इव्हेंट निवडा जेथे तुम्हाला तुमचे पुरवठादार किंवा खरेदीदार भेटतील.

CPhI प्रदर्शने यंत्रसामग्री, उपकरणे, तंत्रज्ञान, सेवा पुरवठादार, वितरक आणि खरेदीदार फार्मास्युटिकल उद्योग या सर्वांना एकत्र आणते. हजारो औषध व्यावसायिकांना नवनवीन मार्केटमध्ये पोहोचण्यास आणि शीघ्र गतीने व्यवसाय सुरु करण्यास CPhI मुळे मदत झाली आहे. औषध उद्योग वेगाने बदलत आहे आणि उद्योजकांना अपेक्षित परिणाम किंव ध्येयसाध्य करून घेण्यासाठी CPhI हे उत्तम माध्यम आहे. अशी प्रदर्शने म्हणजे एक प्रेरणादायी इव्हेंट असून नवीन आणि अद्वितीय संधी मिळवून त्या पूर्ण करण्यासाठी उद्योगतज्ञ मार्गदर्शन करतात. हजारो exhibitors आणि visitors ही प्रदर्शनी नेहमी व्यस्त ठेवतात. भरपूर परिषदा, कार्यशाळा आणि संध्याकाळचे काही खास कार्यक्रम यांना खूप गर्दी असते.

पहिले चार दिवस निरनिराळ्या सभा आणि सामने, तज्ज्ञ लोकांची व्याख्याने, खरेदीदार विक्रेता यांच्या भेटीगाठी, नेटवर्किंग, प्लांट विझिट्स वगैरे आणि उरलेले तीन दिवस प्रदर्शन असा हा भरगच्च कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

UBM Event imageया वर्षी "वूमन इन फार्मा" हा एक आगळा वेगळा आणि महिलांसाठी अतिशय प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्त्रियांमध्ये क्षमता असूनही महिलांनी नोकरी करण्याचे आणि आघाडी घेण्याचे प्रमाण आजही कमी आहे. जगात आजफक्त ३०% स्रिया संशोधक म्हणून काम करीत आहेत. हाच कल भारतातसुद्धा दिसून येतो. अनेक स्त्रिया काही अग्रगण्य कंपन्यांतून मोठमोठी पदे भूषवित असूनही भारतीय फार्मास्युटिकल क्षेत्रात फक्त १५% महिलाच काम करताना दिसतात. परंतु हा टक्का आता वाढत आहे हे या कार्यक्रमातून सिद्ध झाले. ज्या स्त्रिया पारंपरिक रूढी तोडून मोठमोठ्या पदांवर पोहोचल्या अशा यशस्वी आणि कर्तबगार स्त्रियांनी त्यांचे विचार मांडले. तसेच त्यांना आलेले निरनिराळे अनुभव आणि त्यातून मिळालेली माहिती उपस्थितांना सांगितली. या यशस्वी स्त्रियांनी केलेल्या योगदानामुळे भारत आज औषधे बनविणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून नावारूपाला येत आहे.

CPhI इंडिया फार्मा आठवडा, भारतीय उद्योजकांसाठी फार उपयोगी पडला कारण १०० पेक्षा जास्त देशांतील ४0,000 लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सर्व कंपन्यांना व्यवसाय उद्दिष्टे गाठण्यास आणि यापुढील प्रगती करण्यास फार्मा या सप्ताहामुळे निश्चितच दिशा मिळाली यात शंका नाही. CPhI च्या दरम्यान फार्मा उद्योगांच्या दृष्टिनेच अशा प्रकारच्या संमेलनांची व्यवस्था केली जाते. तसेच निरनिराळे तज्ञ बोलावून त्यांचे विचार ऐकायची अद्वितीय संधी मिळते. फार्मा कंपन्या अत्यंत प्रभावीपणे आणि नेमक्या मार्गाने स्वत:ला प्रोमोट करू शकतात. CPhI ची संमेलने म्हणजे जागतिक दर्जाचे व्यासपीठ तसेच संशोधन आणि विकास उद्योगांच्या अंतर्गत झालेले नवीन शोध मिळण्याचे हमखास ठिकाण.

CPhI ग्लोबल कार्यक्रम तसेच प्रत्येक प्रादेशिक शोमध्ये असंख्य सामग्री वैशिष्ट्ये आणि पायोनियर फार्मास्युटिकल उद्योजक भाग घेत असतात. CPhI प्रदर्शनात भाग घेऊन आपण आपला व्यवसाय लक्षणीयरित्या वाढवू शकतो. या वर्षी झालेल्या CPhI P -MEC मध्ये देशोदेशींच्या बहुराष्टीय कंपन्या तसेच भारतातील सर्व अग्रगण्य आणि माध्यम उद्योजकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. खास मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांसाठी India Pavaliian मध्ये मुद्दाम सोय केली होती. P – MEC मध्ये सर्व प्रकारच्या Pharma Machineries उपलब्ध होत्या.

(लेखक गेली ३५ वर्षे भारतीय आणि जागतिक पातळीवर फार्मास्युटिकल क्षेत्रात कार्यरत आहेत.)

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division